वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार तर गाय गंभीर जखमी
आज वाघाने एका म्हशीला ठार केले तर याच वाघाच्या हल्ल्यात एक गाय गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अजयपूरच्या शेत शिवारात ही घटना घडली.
मृत पावलेली महेश संजय भोयर यांची असून गाय दिवाकर गोविंदा चरडुके यांची आहे.
आज सकाळी अजयपूरचे जनावरं अजयपुरच्या शेतात चरायला गेली होती पाणी पिण्यासाठी शेततलावावर हे जनावर गेले असता तेथे दबा धरून असलेल्या वाघाने या जनावरावर हल्ला केला. त्यात म्हैस जागीच ठार झाली तर गाय गंभीरित्या जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.
दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून यामुळे नागरिक शेतकरी संतप्त झाले आहे. दिवाकर चरडुके आणि संजय भोयर यांची जनावरे दुधाळ जनावरे असून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांची खूप मोठी आर्थिक नुकसान झाली आहे.
या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!