मालधक्का विरूदध मूल मध्ये संताप: श्रमिक एल्गारचेही जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

प्रस्तावित रेल्वे मालधक्का विरूदध मूल मध्ये आंदोलनाची धग
मूक मोर्चा द्वारे निवेदन,
माजी खा.हंसराज अहिर यांचे समर्थन,
सर्वच स्तरातून आंदोलनाची तयारी,
मूल शहर बचाव संघर्ष समितीची स्थापना,
श्रमिक एल्गारचे जिल्हाधिका-यांना निवेदन


मूल :- येथील रेल्वे स्टेशनच्या परिसरात सुरजागडच्या लोहखनिजासाठी मालधक्का होणार आहे. त्यातून शहराचे वातावरण बिघडणार आहे. नागरिकांच्या जीवनशैलीवरही त्याचा विपरित परिणाम होणार आहे.पुढील धोका लक्षात घेता येथे मूल शहर बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.त्याद्वारे आंदोलनाची रूपरेषा आखल्या जात आहे. सोमवारी एका मूक मोर्चा द्वारे प्रशासनास निवेदन देवून प्रस्तावित मालधक्क्याचा जाहीर निषेध केला.पर्यावरण तसेच येथील वन्यजीवांच्या रक्षणासाठी आणि स्वच्छ सुंदर मूल साठी रेल्वे मालधक्का हटाव आणि र्प्यावरण बचाव अशी मोहीम राबविली जात आहे.नागरिकांच्या उत्स्फुर्त आंदोलनाला माजी खा. हंसराज अहिर यांनी स्वतः भेट देवून आपले समर्थन घोषीत केले आहे. मूल येथील सर्वच स्तरातून प्रस्तावित रेल्वे मालधक्कयाचा निषेध व्यक्त केला जात असून आंदोलनाची दररोज रूपरेषा आखल्या जात आहे.
मूल शहर हे राज्यातील निसर्गरम्य प्रदूषण मुक्त व विकासाभिमूख धान उत्पादक शहर आहे. गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथून लोहखनिजाचा कच्चा माल मूल येथे आणून देशभर पाठविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी चंद्रपूर मार्गावरील रेल्वे स्टेशनच्या परिसरात मालधक्क्याचे काम सरू करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील सागवणी वृक्षांची कत्तल करण्यात आली होती.मध्यंतरी याला विरोध झालेला होता. परंतु विश्रांती नंतर प्रस्तावित मालधक्क्याच्या कामाला गती येण्याची कुणकुण लागताच सर्वपक्षीय नागरिकांनी,सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी स्वयंस्फुर्तीने एकत्र येत मूल बचाव संघर्ष समिती गठीत केली. त्यामाध्यमातून प्रस्तावित मालधक्याचा निषेध केला जात आहे.मूल मध्ये मालधक्का झाल्यास शहराचे सौदर्य बिघडणार असून शहरात मोठया प्रमाणात वायू प्रदुषण, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदुषणाची भर पडणार आहे. येथील धान उत्पादक शेतक-यांना सुदधा फटका बसण्याची शक्यता आहे. लोहखनिजांच्या वाहतुकीमुळे उडणार्‍या धुळीचा परिणाम धान पीकावंरही पडण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. रस्ते उखडतील आणि अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ होईल.शहराला लागून बफर झोन असल्याने वन्यजीवांना यामुळे धोका निर्माण होवू शकतो. तसेच प्रस्तावित जागेच्या जवळ कर्मवीर महाविदयालयाचे भव्य क्रीडांगण असून येथे दररोज खेळांडूची मांदियाळी असते. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविदयालय शिक्षण घेणार्‍या विदयार्थ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे सर्व धोके लक्षात घेता रेल्वे स्टेशन परिसरातील प्रस्तावित मालधक्का रदद करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. त्याच्या आंदोलनाची धग मूल मध्ये निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!