कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे शिक्षक दिन साजरा

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे शिक्षक दिन साजरा


 मुल - शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल  येथे प्राचार्य. डॉ.अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन घुमडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  डॉ. गणेश गायकवाड यांनी ऐतिहासिक दाखले देऊन विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते समजावून सांगितले. अधेक्षीय भाषणात प्राचार्य  डॉ. अनिता वाळके यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्तीत होते.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. जि. एस. आगलावे यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रवीण उपरे यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!