28 सप्टेंबर 2022 हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करणे बंधनकारक करावा याकरिता दिले निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - भारत सरकार नोंदणीकृत रजिस्टर क्र. 125263 स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार जिल्हा भंडारा येथील पदाधिकारी यांनी 28 सप्टेंबर 2022 हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करणे बंधनकारक करावा ,या मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा उपअधिकारी यांना दि. 15/09/2022 रोजी दिले. व त्यामध्ये माहिती अधिकार व संघटनेचे उद्दिष्टे व नियम या संबंधित चर्चा सुद्धा केली.निवेदन सादर करीत असताना संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष शेखर जिभकाटे (प्रेस) ,कार्याध्यक्ष शेखर पारधी सर ,पोलीस मित्र प्रवक्ता किशोर जुमळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!