राज्य सरकारने महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी - विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस चिमूर

उप संपादक
विलास मोहिणकर
        
चंद्रपूर : - नुकताच चिमूर तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. तसेच शेतातील बांधाचे अतिवृष्टीने उपसा होवून पिके गाळली गेली यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या नुकसानीचा सर्वे महसूल विभाग, कृषी विभाग व ग्रामपंचायत मार्फत करून तो सरकारला सादर करण्यात आला.झालेली नुकसान भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. नेहमीच शेतकऱ्यांना असमानी संकटाचा सामना करावा लागतो. त्यांचा लागलेला खर्च भरून निघेल व त्यांच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल यासाठी सरकारने तातडीची मदत करावी व चिमूर तालूका ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस चिमूर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!