सुधीर मुनगंटीवार पुन्हा मंत्री मूल भाजपात आनंद




भारतीय जनता पार्टीचे राज्यांचे जेष्ठ नेते बल्हारपूर मूल विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रीमंडळात समावेष झाल्यांचा आनंदोत्सव मूल शहरातील गांधी चौकात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला.

महाविकास आघाडीची सरकार गेल्यानंतर राज्यात भाजपा शिंदेगट सत्तारूढ झाला. पुन्हा भाजपाची सत्ता येताच मुनगंटीवार हे मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री बनतील हे निश्चित होते.  आजच्या मंत्री मंडळाच्या विस्तारात मुनगंटीवार यांना राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी मंत्री पदाची शपथ देताच, मूल तालुका भाजपाचे कार्यकर्त्यांनी गांधी चौकात एकत्र येत, फटाके फोडून आणि ढोल तासांचे गजरात आनंदोत्सव साजरा केला.  यावेळी मुनगंटीवार यांचे विजयाचे घोषणाही दिल्या.

आनंदोत्सव साजरा करणार्यात तालुका भाजपा अध्यक्षा संध्या गुरूनुले, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, अजय गोगूलवार, चंदू आष्टनकर, प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे यांचेसह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!