चिमूर तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत केली जाते जनतेकडून पैशाची लूट
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत जनतेकडून कास्ट , डोमेशिअल , इन्कम सर्टिफिकेट , सालवंशी व आदी सर्टिफिकेट तयार करीत असतांना शासकीय फी व्यतिरिक्त जनतेकडून अतिरिक्त शुल्क घेतली जात असून घेतलेल्या पैशाची पावती सुद्धा दिली जात नाही.कोऱ्या पेपरची कात्रणे फाडून त्यावर तारीख लिहून दिले जात असते.प्रत्येक सर्टिफिकेट मागे १० रुपये आणि अतिरिक्त शुल्काची सुद्धा मागणी केली जात असते त्याची पावती सुद्धा प्रत्येक जनतेला दिली जात नाही.याची तहसीलदार , नायब तहसिलदार यांना माहिती असतांना त्या कर्मचारी वर्गाचे पगार कमी आहे म्हणून कारवाई केली जात नाही फक्त तक्रार कर्ते यांना आश्वासन दिले जाते.यामध्ये या अधिकाऱ्यांची हातमिळवणी सुद्धा असू शकते असे यावरून सिद्ध होते. म्हणून सेतू विभागाच्या कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात येत नाही.यापुढे अशाप्रकारे जनतेकडून पैशाची लूट अशीच सुरु राहिली तर भ्रष्टाचार वाढेल आणि जनतेची दिशाभूल करून फसवणूक होतच राहील याकडे वरीष्ठ अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन सेतू विभागातील ठेकेदार कंत्राटी कर्मचारी यांचेवर कारवाई करावी अशी जनतेकडून मागणी केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!