घोडाझरी नहराचा उपसा करण्यात यावा




तळोधी बा:(यश कायरकर) 
        घोडाझरी धरणाचे पाणी नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील लाभक्षेत्रात येत असलेल्या गावापर्यंत जात असल्याने मुख्य वितरेकेवर मोठ्या प्रमाणावर कचरा वाढलेला असल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे नहराचा उपसा करण्याची मागणी लाभ क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. 
   घोडाझरी नहराचा मुख्य वितरिका सहित असलेल्या तळोधी वितरिका व नवरगाव वितरिका असलेल्या नहरावर मोठ्या प्रमाणावर केरकचरा वाढला आहे. तसेच अनेक ठिकाणी नहराला भेगा पडून भगदाड पडलेले आहे. मात्र अजूनही सिंचाई विभागाचे वतीने दुरस्ती केली गेलेली नाही. आणि मग नहर सोडल्यानंतर सिंचाई विभागाच्या वतीने ओबडधोबड सफाई केली जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रात येत असलेल्या शेवटच्या शेतातील शेतात पाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे घोडाझरी नहराचा नहर सोडण्यापूर्वी उपसा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!