नवोदय विद्यालय (बा.) द्वारे फेरीचे आयोजन व चॉकलेट वाटप, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत काढण्यात आली रॅली.



 तळोधी बा (यश कायरकर) 
 जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूर तळोधी बाळापुर  च्या  द्वारे आज जवाहर नवोदय विद्यालय ते नागपूर - मुल हायवे पर्यंत रॅली काढण्यात आली. या अंतर्गत नागपूर मुल हायवेवर दोन्ही बाजूला विद्यार्थी उभे राहून त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना  चॉकलेटचे वाटप करून अमृत महोत्सव बद्दल मार्गदर्शन केले. ही रॅली काढण्यात आली त्यावेळेस या रॅलीचे मार्गदर्शन जवाहर नवोदय विद्यालय च्या प्राचार्य मीणा मणी यांनी केले. तर जवाहर नवोदय विद्यालय मधील संपूर्ण शिक्षक,कर्मचारी, व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळेस उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!