मृतकाच्या कुटुंबास मिळाली आर्थिक मदत.....
शेगाव (जगदीश पेंदाम)
वरोरा तालुक्यातील जवळच असलेल्या वायगाव भोयर येथे 30 जुलैला शेतात काम करीत असलेल्या महीला यांच्यावर विज पडून मरण पावल्याची घटना घडली होती आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना वायगाव भोयर येथील हिरावती शालिक झाडे वय ४५ वर्ष,पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष,मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष रीना नामदेव गजभे वय २० राहणार वायगाव भोयर अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला होता या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी केली होती याची दखल घेत शासनाने प्रत्येक व्यक्तीला 4 लाख रुपये वरोरा तहसीलदार मकवाने मँडम,नायब तहसिलदार भगत, पटवारी वालोदे यांच्या उपस्थितीत मृतकाच्या कुटुंबांना देण्यात आली......



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!