तळोधी बा. येथील वयोवृद्ध इसमाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

तळोधी बा. येथील वयोवृद्ध इसमाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

तळोधी बा(यश कायरकर) 
तळोधी बा. येथील राममंदिर वार्डातील रुषी श्रीहरी शंखपाल वय ७८ वर्ष या वयोवृद्ध इसमाने आजाराला कंटाळून रात्री च्या वेळेस सर्व घरातील व्यक्ती झोपी गेल्या नंतर घरा जवळून काही अंतरावर असलेल्या चुनारकर यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
     वयोवृद्ध इसम अनेक वर्षांपासून मधुमेह व बि. पी. या आजाराने त्रस्त झालेले होते. घरची परिस्थिती गरिबी ची असल्याने जीवनाला कंटाळून त्या ने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी तळोधी बा पोलीस स्टेशन च्या वतीने घटना स्थळी येऊन पंचनामा करण्यात आले. वयोवृद्ध इसम मागे पत्नी, मुले व मुली व नातवंडे असा आप्त परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!