विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदारी आमदार विजय वडेट्टीवार घेणार काय?

विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदारी आमदार विजय वडेट्टीवार घेणार काय? 
नवरगाव वासी यांचा सवाल!


नवरगाव (अमोल निनावे)

सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मध्ये लोकसेवा प्राथमिक शाळा सुरु असून त्याठिकाणी  केजी टू फोर्थ स्टॅण्डर्ड पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. 

श्री. गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाचा बांधकामाचा अंदाजित खर्च ३० लक्ष रुपये असून जुलै २०२१ मध्ये भूमिपूजन तत्कालीन माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी करून खड्डे मात्र खोदुन ठेवलेत.

प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात होईल-उद्या कामाला सुरुवात होईल असे म्हणता म्हणता सरकार गेले तरी मात्र  खड्ड्याच्या पलीकडे बांधकामाची प्रगती नाही.

शाळेच्या गेट समोर मोठ मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आलेले असल्यामुळे तसेच जुनी शाळेची इमारत पाडून त्या शाळेचा पुरा मलमा शाळेच्या समोरच टाकण्यात आलेला असल्यामुळे मलब्याचे उंच ढीग झाले आहेत आणि त्याखालीच सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन आमदार  विजय वडेट्टीवारांनी मोठ्या धड्याक्यात करून खोदलेले मोठमोठे खड्डे आजही जैसेथेच्याच अवस्थेत ठेवलेत.

खड्ड्यात पाणी साचलेले असते. छोटी छोटी मुले शाळेने टाकलेल्या मलब्याच्या उंच भागात खेळत असतात.

खड्ड्यात पाणी साचलेले असल्यामुळे नकळत कुणी विद्यार्थी किंवा अंजान व्यक्ती त्या ठिकाणी कोणीही नसतांना खड्यात पडून न होणारी घटना दुर्दैवाने घडली तर सदर घटनेला जबाबदार कोण !!?? या चिंतेने पालक आणि नागरिक हैराण झालेले आहेत.

पण मात्र विकासपुरुष (?) आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात सदर बाब त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणून दिली की नाही कुणास ठाऊक !!??

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निधीमधून बांधकाम निधी खर्च अंदाजे ३० लक्ष रुपये मंजूर असून श्री गुरुदेव सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन होऊन सुद्धा लोकनेता असणाऱ्या विकासपर्व आमदार विजय वडेट्टीवार यांना पूर्णत्वास का नेता आले नाही !!?? हा जनतेचा तीव्र आक्रोश आहे.

जनतेचाच पैसा जनतेच्याच कल्याणकारी कार्यासाठी खर्च करतांना ढिसाळपना का !!?? 

जीविताला दुर्दैवाने धोका होवु नये यासाठी त्याठिकाणील शाळेचा मलबा बाहेर फेकला जावा तसेच खड्डे सुद्धा प्रत्यक्षात काम सुरू होत नाही तोवर बुजविण्यात यावेत आणि बोर्ड सुद्धा काढून जागेचे सपाटीकरन करण्यात यावे अशी जनतेची मागणी जोर धरू लागल्याचे प्रतिधीनीच्या लक्षात आले.

त्यामुळे एकतर जोमाने काम सुरु करावे किंवा ते खड्डे बुजवून शाळे समोरील मातीचा ढिगारा बाहेर फेकावे अशीं शाळेतील पालकांची तसेच नवरगांव येथील जनतेची मागणी आहे.

अन्यथा उग्र आंदोलन करण्याच्या विचारात नवरगांव येथील नागरिक असल्याचे प्रतिनीधीला दिसून आले.

अमोल निनावे,
प्रतिनिधी सिंदेवाही.
संपर्क क्रमांक :
९७६४२७१३१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!