प्रहार सेवक विनोद उमरे आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात
जि.प.क्षेत्रामधील सक्रीय भुमिका व कामामुळे आता पासूनच विरोधकांना सुटलाय घाम
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून अपंग, विधवा, निराधार, शेतकरी,शेतमजूर च्या न्याय हक्कांसाठी व युवा पिढी बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे.तसेच या जिल्हा परिषद क्षेत्रात विनोद उमरे या नांवाची चर्चा सुरू आहे.विनोद उमरे सावरी (बिडकर) येथे राहत असून चिमूर तालुक्यातील व सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. सर्व सामान्य माणसाचे अपंग, विधवा,निराधार, शेतकरी,शेतमजूर प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहे.गेल्या काही वर्षांपासून विनोद उमरे सामाजिक कार्यात व राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. चिमूर तालुक्यातील संपूर्ण युवकांचा विनोदला पाठींबा आहे.वक्तृव, कर्तृत्व आणि नेतृत्व हे गुण विनोद मध्ये आहे.प्रहार सेवक विनोद उमरे हे गरीब शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर विषयक प्रश्नांवर विनोदची कठोर भुमिका असते.युवकांमध्ये विनोदचे नेतृत्व डोक्यावर घेतले आहे.अनेक युवक त्यांच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत.आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलने करुन ते अपंग, विधवा, निराधार, शेतकरी, शेतमजूर चे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जाऊन मार्गी लाहुण न्याय मिळवून देतात.अधिकार्यावर त्यांची वचक आहे.विनोद उमरे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मैदानात उतरावे अशी सर्वसामान्य माणसांची भावना आहे. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणून हुकुमत गाजवणे असुन जवाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून ,सोबत घेऊन प्रगती करणे होय.याच हेतूने ते लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करणे हेच सिध्दांत बाळगून जोमाने जिल्हा परिषदेच्या निवडणूकिसाठी प्रथमच उमेदवारी दाखल करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!