सरडपार येथे कृषी दिन साजरा
सिंदेवाही (प्रतिनिधी)
कृषी महाविद्यालय मूल (सोमनाथ) येथील विद्यार्थिनींनी सरडपार येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत व कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत दि.२५/०६/२०२२ ते दि. ०१/०७/२०२२ रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता .यामधे दि.२५/०६/२०२२ रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार , दि.२६/०६/२०२२ रोजी पौष्टिक तृणधान्य दिन , दि.२७/०६/२०२२ महिला कृषी तंत्रदान सक्षमीकरण , दि.२८/०६/२०२२ रोजी खत बचत दिन दि. २९/०६/२०२२ रोजी प्रगतशील शेतकरी संवाद , दि.३०/०६/२०२२ रोजी शेती पूरक व्यवसाय व दि.०१/०७/२०२२ रोजी कृषी दिन राबवण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून सरडपार ग्रामपंचायत चे सरपंच उज्ज्वला सिडाम , उपसरपंच किशोर कोठेवार , कृषी अधिकारी ए.एस. चिव्हाने (सिंदेवाही) , कृषी पर्यवेक्षक एम. ढवळे (सिंदेवाही), कृषी सहाय्यक टी.एस.गाडगे (सरडपार) , कृषी सहाय्यक आर.एन.कणखर (पवनपार),कृषी सहाय्यक चिडे, भाऊराव कोठेवार (प्रगतशील शेतकरी) ,कृषी मित्र अरविंद कोठेवार ,सतीश सामृतवार (प्रकल्प विकास अधिकारी आय.सी.आय.सी.आय.फौंडेशन ) राकेश पाखमोडे (आय.सी.आय.सी.आय.फौंडेशन) व समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
कृषी संजीवनी सप्ताह कालावधीत विविध प्रात्यक्षिक , प्रशिक्षण व वृक्षारोपण इ. कार्यक्रमाचे ग्रामस्तरावर आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
या अनुषंगाने श्रेया नखाते , आचल रहांगडाले , वैष्णवी कोठारे , चेतना खरबडे , मोहिनी भानारकर , बमलेश्वरी पोठले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कृषी महाविद्यालय मूल (सोमनाथ) चे सहयोगी अधिष्ठा डॉ. विष्णूकांत टेकाळे, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही चे प्रमुख डॉ. एन.कापसे व कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलेश सरनाईक यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!