आंबेझरी येथील रो.ह.यो. मजुरांची मजुरी द्या पाच महिन्यापासून मजूर आहेत मजुरीपासून वंचित घनश्याम मेश्राम यांचा आंदोलनाचा इशारा

आंबेझरी येथील रो.ह.यो. मजुरांची मजुरी द्या

पाच महिन्यापासून मजूर आहेत मजुरीपासून वंचित

घनश्याम मेश्राम यांचा आंदोलनाचा इशारा

जिवती /प्रतिनिधी

जिवती तालिक्यातील आंबेझरी येथे फेब्रुवारी 2022 मध्ये रोजगार हमी योजनेवर तब्बल दोन महिने मजुरांनी काम केले मात्र आदिवासी मजुरांना डावलून इतर मजुरांची मजुरी देण्यात आली असल्याने सदर कामात गैरव्यवहार झाले असल्याचे आरोप श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष तथा ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी केला आहे. 

आंबेझरी येथील आदिवासी मजुरांनी मागील महिन्यात जिवती तहसिल कार्यालयावर मोठया संख्येने जाऊन मजुरीची मागणी केली. मात्र अश्वासनापलेकडे त्यांना काहीच मिळाले नाही. अजूनही साधी चौकशी तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी यांनी केली नाही. 

 शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला असून आंबेझरी येथील मजुरांच्या प्रश्नांची दखल घेत श्रमिक एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रविण चीचघरे, घनश्याम मेश्राम, ऍड. कल्याण कुमार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी करून मजुरांना मजुरी द्यावी व गैरव्यवहार केलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनातून कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!