राज्य सरकारने ग्राम पंचायत कर्मचार्याच्या किमान वेतनात पगार वाढ करण्याचा शासन निर्णय मंजूर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - राज्य सरकारने ग्राम पंचायत कर्मचार्याच्या किमान वेतनात पगार वाढ करण्याचा शासन निर्णय दिनांक.२२/०६/२०२२ ला शासनाने निर्गमित केलेला असून ग्राम पंचायत परिमंडल नुसार किमान १२ ते १४ हजार वेतन मिळणार आहे त्यामुळे ग्रा.प.कर्मचारी यांचेत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
     राज्यातील ग्राम पंचायत मधील कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दिनांक १ एप्रिल २०२२ पासून शासनाने लागू करण्यात आले आहे.शासन निर्णयाची प्रत व संघटनेचे पत्र विस्तार अधिकारी गुंतीवार तसेच शामकूले यांना देण्यात आले. व तालुक्यातील समस्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका यूनियन चे अध्यक्ष गोपाल गावतुरे , सचिव  किशोर कामडी , उपाध्यक्ष दिलीप डांगे तसेच सदस्य सचिन कावरे तसेच सम्पूर्ण कार्यकारिणी व बहुसंख्य ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते. कर्मचार्याणि या आनंदा च्या क्षणी गुलवाल उधळवून जल्लोष साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!