मूल शहरात चालला बुलडोझर, नगर परिषदेची कार्यवाही



मूल (मंगला बोरकुटे)
शासकीय नालीवर अतिक्रमण करून, पक्की घरे बांधणार्यांवर मूल नगर परिषदेने आज बुलडोजर चालविला. नगर परिषदेच्या या कार्यवाहीने अतिक्रमणधारकांत खळबळ माजली आहे.
मूल शहरातील दुर्गा मंदीर परिसरातून वाहणार्या नाल्यावर अनेकांनी पक्की घरे बांधून, नाला बुजवून टाकला होता. यामुळे पावसाचे पाणी साचून अनेकांचे घरात पाणी घुसत होते व हानी होत होती. नागरीकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी दाखल केले होते. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत, मूल नगर परिषदेचे प्रशासक महादेव खेळकर, प्रभारी मुख्याधिकारी मनिषा वजाडे यांचे मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.
सदर नाल्यांचे बाजूला मोठा रस्ता तयार करण्यात येणार असून, या रस्त्यावर अतिक्रमण आले असल्यांनेही ही कारवाई केल्यांचे बोलल्या जात आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटाव कार्यवाही केल्यांने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!