सावरगाव येथे हनुमान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन
तळोधी बा (यश कायरकर)
सावरगाव येथील हनुमान मंदिराची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या जागेवर नवीन बांधकाम करण्याकरता आज भूमिपूजन करण्यात आले. सावरगाव येथील एकमेव पुरातन हनुमान मंदिर असलेल्या ठिकाणी जेव्हापासून आपल्या देशात गणपती पूजेची सुरुवात झाली तेव्हापासून एक गाव एक गणपती अशीच प्रथा सुरू असून आज पर्यंत याच मंदिरात गणपतीची मूर्तीची स्थापना करण्यात येत असे. मात्र मंदिराची इमारत जुनी व जीर्ण झाली असल्याने. आता त्या ऐवजी नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे. या बांधकामास सुरुवात करण्याकरता त्या ठिकाणी मंदिराच्या नवीन बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी हनुमान समाज समितीचे सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!