साब नेचर केअर संस्थे'द्वारे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले.

साब नेचर केअर संस्थे'द्वारे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी  यांना निवेदन देण्यात आले.


 तळोधी (बा.)
 
 स्वाब नेचर केअर संस्थेत च्या वतीने उपवनसंरक्षक वन विभाग ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले.
  हे निवेदन 'जंगलात वणवा लागून जळालेल्या जंगल परिसरातील तेंदूपत्ता संकलनाचे परवानगी रद्द करण्यात यावी' याकरिता हे निवेदन देण्यात आले. 
                 वास्तविक परिस्थिती पाहता जंगलाला मागच्या वर्षी पासून मोठ्या प्रमाणात वनवा लागण्याच्या घटना निदर्शनास येत आहे मागील वर्षी ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकांश जंगल परिसर हा वणव्याच्या आगीत जळालेला होता. त्यामध्ये घोडाझरी अभयारण्य हा दोनदा जळाल्याची घटना घडली होती. तसेच या वर्षी सुद्धा 22 मार्चला या विविध ठिकाणी जंगलामधे वणवा लागण्याच्या घटना घडल्या आणि ह्या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहेत असा अंदाज वर्तविणे चुकीचे होणार नाही. 
                 जेव्हा जेव्हा तेंदूपत्ता संकलनाचे ज्या ज्या जंगल परिसरात टेंडर मंजूर होतात त्या  त्या परिसरात व त्या त्या वर्षी जास्त प्रमाणात वनवा लागल्याच्या घटना निदर्शनास येतात. यावरून व परिसरातील लोकांच्या मते   तेंदूची झाडे जळली  अधिक पाने येतात या भ्रमात तेंदूपत्ता संकलन करणारेच जंगलाला वनवा लावतात असे बोलले जाते. त्यामुळे जंगलात वनवा लागण्याच्या घटनांपैकी पंचाहत्तर(७५%) टक्के जंगल जाळण्याच्या घटना ह्या तेंदूपत्ता संकलन करणारे. व दहा(१०%) टक्के घटना मोहफुले गोळा करणाऱ्याच्या द्वारे,  जंगलात वनवा लागण्याच्या घटना घडतात. तर दहा(१०%) हे इतर लोक  जाळतात. फक्त पाच(५%) टक्के वणव्याच्या घटना हा नैसर्गिक असतात.
               त्यामुळे ज्या परिसरामध्ये वनव्यात जंगल जळालेला असेल त्या परिसरातील तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर रद्द करून तेंदुपत्ता संकलन वर बंदी आणण्यात यावी, जेणेकरून जंगलात आग लागल्यानंतर तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर रद्द केले जाते यामुळे तेंदूपत्ता संकलन करणारे पुन्हा अशा पद्धतीने जंगल जाळणार नाही व वनव्यात जंगलाची होणारी हानी मोठ्या प्रमाणात थांबवता येऊ शकते. या संदर्भाने निवेदन उपवनसंरक्षक वनविभाग ब्रह्मपुरी यांना 'स्वाब नेचर केअर संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
                यावेळेस 'स्वाब नेचर केअर संस्थेचे' अध्यक्ष यश कायरकर , उपाध्यक्ष स्वप्नील बोधनकर, सदस्य महेश बोरकर, विकास बोरकर, हितेश मुंगमोडे,  हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!