जिल्ह्यातील तीन व्यक्ती राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी
७ मार्च रोजी पुणे येथे होणार वारजुरकर, कोरेवार, गजपुरे यांचा सत्कार
सावली (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य द्वारा देण्यात येणारा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा गटनेता सतीश वारजुरकर, सावलीचे पंचायत समिती सभापती विजय कोरेवार व जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांना जाहीर करण्यात आलेला असून ७ मार्च रोजी पुणे येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत नेताना ग्रामपंचायतीसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या कामगिरीची नोंद व्हावी याकरीता असोसिएशनचे वतीने प्रथमच अशा पुरस्काराची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यातून विशेष कामगिरी करणाऱ्या पदाधिकारीमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील तीन व्यक्तींना जाहीर झाला असून ७ मार्च रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे हस्ते होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!