चिमूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक १ मध्ये दलालांचा सुळसुळाट
दुय्यम निबंधकाचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.२५/०३/२०२२ अनेक दिवसांपासून चिमूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक १ मध्ये दलालांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे.मूल्यांकन प्रमाणपत्र , विक्रीची दुय्यम पत्र , विक्रीपत्र, बक्षीसपत्र , मृत्युपत्र , अशी विविध प्रकारची नोंदणीकृत दस्तांची कामे याठिकाणी केली जात असून हि संपूर्ण कामे फक्त आणि फक्त दलालांच्या माध्यमातून जनतेची लूट करून केली जात असते.याबाबत दुय्यम निबंधक यांना लक्षात आणून दिले असतांना सुध्दा चक्क अधिकारी यांच्या टेबल पर्यंत दलालांची एन्ट्री बघायला मीळत असेल तर काय ? यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक हताश झाल्यागत ऑफिस बाहेर काम केव्हा होईल याची वाट बघत असतात.आणि दलाल आपली कामे करून तात्काळ मुक्त होतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!