दिल्ली येथे पोहचली ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे....

दिल्ली येथे पोहचली ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे....

शंकरपुर.... जगदीश पेंदाम
           
रशिया युक्रेन देशाचे युद्ध सुरू झाले असल्याने, रशिया व युक्रेन  देशात शिक्षण घेण्यासाठी भारतातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी अडकले असून, चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील ऐश्वर्या खोब्रागडे हि सुद्धा या देशात अडकलेली होती मागील सात आठ दिवसांपासून शंकरपूर येथील ऐश्वर्या खोब्रागडे तिचे आई-वडील ऐश्वर्याची आतुरतेने मुलींची दरवाज्यामध्ये वाट बघत असून, बाळा तू लवकर घरी ये ना...! अशी आर्त हाक दिली जात आहे...
भारतीय विद्यार्थ्याने सुखरूप आणण्यासाठी भारतीय दुतवासी सह केंद्राचे मंत्री, केंद्राची मिशन गंगाचा माध्यमातून दिवस रात्र सतत प्रयत्न करत असुन युक्रेन, हंगरी मधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढत आहे..
          शंकरपूर येथील ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे ही विद्यार्थी 2017 पासून एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन मधील टरनोपिल शहरांमध्ये शिक्षण घेण्याकरीता गेली असून, हंगेरी मधील बुडापेस्ट राजधानीमध्ये  ती सुखरूप होती, युक्रेन च्या घड्याला नुसार काल रात्री साडेआठ वाजता तिला भारतातील विमानामध्ये बसवून दिल्ली येथे रवाना करण्यात आले, असून आज गुरुवारला सकाळी 11 वाजता दिल्ली येथील विमानतळावर 220 विद्याथी सहित आलेली आहे..
तिला महाराष्ट्र सदन दिल्ली मध्ये आराम करण्याकरता ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी जेवण्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आले..
दिल्ली या ठिकाणी प्रत्येक राज्याचे एक केंद्र असून त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना संबंधित राज्य मध्ये जाण्याकरिता करीता एकफार्म अधिकाऱ्यांमार्फत भरून घेतले जाते व नंतर त्या-त्या ठिकाणी पाठवले येईल पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे...
तीन वर्षाच्या अगोदर ऐश्वर्या आहे गावाकडे आलेली असता तिला भारतीय जेवन मिळाले होते. ती  गुरुवारला दिल्ली येथे सकाळी 11 वाजता आली असता तिला तीन वर्षानंतर भारतीय जेवन भात, पोळी, वरण, चटणी, लोणचं मिळाल्यानंतर तिला आनंद झाला ते आनंदाने जेवण केले असल्याचे तिने आई वडीलांना फोन द्वारे माहिती दिली असून उद्याला नागपूर येथे रात्री अकरा वाजता विमानतळावर पोहचत असल्याचे आई वडीलाला सांगितलेले आहे.... 

चिमुर क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी फोनद्वारे आई-वडिलांची विचारपूस केली असून माहिती घेतली.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!