भंडारा जिल्हा भाजयुमो तर्फे साकोली येथे 98 युवकांना रोजगार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य यांच्या नेतृत्वात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने जिल्हाभर तालुका निहाय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविले होते त्या निमित्ताने दिनांक 23 मार्च 2022 ला साकोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सेक्युरिटी स्किल काँन्सिल ऑफ इंडिया आणि एस आय एस इंडिया लिमिटेड तर्फे सुरक्षा जवान पुरुष पदासाठी मेगा भरती घेण्यात आली. भरती ही भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आली.कोरोना महामारी च्या संकटामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. या मेळाव्यात तालुक्यातील 430 युवक सहभागी झाले, सहभागी झालेल्या युवकांची चाचणी होऊन 98 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. पुढील ट्रेनिंग करिता भंडारा जिल्ह्यातील पहिली टीम दिनांक 27 मार्च ला हैदराबाद साठी रवाना होत आहे.झेंडा चौक शेंदूरवाफा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार साकोली विधानसभा क्षेत्र भाळाभाऊ काशीवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी बाळबुधे, जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरीताई नेवारे, जिल्हा परिषद सदस्या वनिताताई डोये, माजी नगराध्यक्ष धनवंताताई राऊत, जगनजी उइके, भाजयुमो जिल्हा महामंत्री राधेश्यामजी मुंगमोडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष व युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक महेंद्रजी गभने,जि. उपाध्यक्ष अमोल हलमारे,ता. अध्यक्ष दीपक हिवरे,शहर अध्यक्ष सपणभाऊ कापगते किशोर कापगते, पंकज मुंगमोडे, भरती ऑफिसर रोशनलाल सिंग, निखिल कटरे, पुष्कर करंजेकर,जि. सचिव विकास कापगते, चंदूभाउ कापगते, विलास गहाणे, प्रेमराज सोनवणे, मितीकेश राऊत, दीपक काळसर्पे, देवेंद्र बोरकर, महेंद्र तुरकर, आणि स्थानिक युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!