तळोधी बा.नगरपंचायत करण्यासाठी पालकमंत्री वड्डेटीवार यांना तळोधीकरांचे निवेदन

तळोधी बा.नगरपंचायत करण्यासाठी पालकमंत्री वड्डेटीवार यांना तळोधीकरांचे निवेदन 

तळोधी बा.(यश कायरकर)

       अप्पर तळोधी बा. तालुक्यात सर्वात मोठी १७ सदस्य  ग्रामपंचायत असताना निधी अभावामुळे गावाचा विकास  खुंठला आहे .मात्र तरीसुद्धा भिसी    ला नगर दर्जा दिला जात असताना तळोधी नगर पंचायत दर्जा दिला जात नसल्यामुळे आज तळोधी बा.येथील नागरिकांच्या वतीने तळोधी बा.शहराचा विकास करण्यासाठी तळोधी बा.ग्रामपंचायतचे नगर पंचायत मध्ये रुंपातर करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे .
    तळोधी बा.अप्पर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ आहे .याठिकाणी अप्पर तहसिल कार्यालय ,पोलिस स्टेशन ,वनपरिशेत्र कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समीती,स्टेट बँक,अंँक्सीस बँक ,कोकण बँक,सि.डी..सी.सी.बँक ,धनश्री पतसंस्था,कोहिनूर पतसंस्था,श्रीलक्ष्मी पतंसंस्था,स्वामी पतसंस्था,साईकृपा पतसंस्था,नवोदय विदयालय,महात्मा फुले विदयालय,लोक विदयालय,गोंविदप्रभू महाविद्यालये ,यादवराव पोशट्टीवार महाविद्यालये ,काँन्हेट स्कुल व सहकारी सोसायटी आहेत मात्र गावातील अंतर्गत रस्ते व नाल्या निधी अभावी रखडले आहेत .या गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे .या गावाशी आजूबाजूच्या ४२ गावाचा संपर्क येत असल्यामुळे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे निधी अभावी गावाचा विकास करण्यासाठी तळोधी नगरपंचायतला दर्जा देण्यात यावा याकरिता नागभीड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन कटारे,सेवा सहकारी सोसायटी उपाध्यक्ष डांँ.मनोहर टेंभूरकर,माजी सभापती अशोक ताटकर,पत्रकार संजय अगडे,तेली समाजाचे माजी अध्यक्ष विष्णूजी देशमुख ,माजी पोलिस पाटिल रतनलाल जयस्वाल,सेवानिवृत्त शिक्षक सुरेश सेलोकर,अजय भागवतकर,रमेश गेडाम,खुशाल मदनकर या शिष्टमंडळाने आप्तती व्यवस्थापन मंत्री विजयभाऊ वड्डेटीवार याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाला लवकरच नगरपंचायत करण्याचे पालकमंत्याचे वतीने आश्वासन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!