मुलांना आदर्श नागरिक घडवण्यासाठी शिक्षणाची गरज - प्रा.सरोज शिंगाडे

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक 3 जानेवारी 2022 ला क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांची 191 वी जयंती ढोरपा मौशी येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक महिला महासंघाच्या वतीने करण्यात आले. सकाळी 8 वाजता गावातील संपूर्ण नागरिक, शालेय विद्यार्थी, शिक्षक व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन करून मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ढोरपा या गावच्या प्रथम नागरिक माननीय सविता ताई निशाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीआई फुले यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारतातील प्रथम शिक्षिका दुसरी तिसरी कुणीही नसून फक्त आणि फक्त सावित्रीआई फुले ह्याच होत. या देशात स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे सर्वप्रथम सावित्रीआई यांनीच उघडली. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा.सरोज शिंगाडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी यांनी सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आपल्या भाषणामधून त्यांनी शिक्षण घेताना आपल्या मुलांची जबाबदारी केवळ शिक्षकांवर न ठेवता ते शाळेतून घरी आल्यानंतर आईवडिलांनी सुद्धा स्वतः मुलांची जबाबदारी घ्यावी व त्यांच्यावर योग्य संस्कार द्यावेत तेव्हाच आपली मुले आदर्श नागरिक बनून आपले कर्तव्य पार पडतील यासाठी मुलांना आदर्श नागरिक घडवण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे असे मत व्यक्त केले. यानंतर मा. मृणालिनी शिवणकर इंजी. नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जीवनातील अनेक कटू प्रसंगाची आठवण करून दिली. मुलींना शिक्षण देताना व घडविताना योग्य संस्काराची अतिशय गरज आहे. शिक्षण म्हणजे फक्त घोकंपट्टी करून पाठांतर करणे नव्हे, तर त्या शिक्षणाचा उपयोग मुलांचे सामाजिक, मानसिक व सांस्कृतिक या सर्व पैलूंचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे शिक्षण होय व मानवाला आंतरिक सुंदरता प्राप्त करण्याचे एकमेव आभूषण म्हणजे शिक्षण होय. असे मत व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षणावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केला. या प्रयोगाला उपस्थित समुदायाकडून टाळ्यांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावचे प्रतिष्ठित नागरिक मा. मुखरुजी निशाने यांनी आपल्या भाषणातून हल्लीच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी दुरावस्था प्रतिपादित केली. आजचे शिक्षण हे खूप महागडे झाले आहे. भारतीय संविधानामध्ये शिक्षण हे मोफत व सक्तीचे असताना सुद्धा सर्व गरीब मुलांना योग्य प्रकारे ते मिळत नाही. त्यासाठी सरकार ने मुलांना योग्य शिक्षण उपलब्ध करून घ्यावे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. अशोक शिंगाडे सर, सुधाकर मेश्राम, शंकरजी उंबरकर, सुखदेव राऊत, यमुताई उंबरकर, बालू नवघडे व इतर गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन मा निर्मलाताई जीवतोडे यांनी तर आभार श्रीदेवी मैंद यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!