तळोधी(बा)(यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तलोधी(बा) येथे दिनांक १२ व १३ जानेवारी २०२२रोजी १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात आले. महात्मा फुले विद्यालयात १७० विद्यार्थ्यांचे व कनिष्ठ महाविद्यालयातील ६७० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
सदर लसीकरणासाठी तळोधी (बाळापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मंडल साहेब तसेच दिनेश कामडी यांच्यासह काही आरोग्य सेवकांनी आपली उपस्थिती दर्शवून विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जी.जे बुलबुले यांनी कोविड समस्यांचा प्रादुर्भाव थांबवण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक, असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक सौ. मंदाकिनी बोरकर व पर्यवेक्षक प्रा.अजय कोराने आणि समस्त प्राध्यापक,शिक्षक यांच्या सहकार्यातून अभियान यशस्वीरित्या पार पडले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!