वाहनगांव येथे श्री गुरू गोविंदसिंघ जी यांचा प्रकाश पर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - दिनांक.०५/०१/२०२२ ला वाहनगांव येथे गुरूद्वारा प्रबंधक कमेटी वाहनगांव तफ्रे दर वर्षी प्रमाणे यंदा हि श्री गुरू गोविंदसिंघ जी यांचा प्रकाश पर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला. श्री गुरु गोविंदसिंघजी च्या जिवना विषयी माहिती देण्यात आली. गुरू ग्रंथ साहिब चा अखंड पाठ करण्यात आले. या अखंड पाठास दि.०३/०१/२०२२ ला सुरवात करण्यात आली व दिनांक.०५/०१/२०२२ ला समाप्त करण्यात आला.तसेच या कायक्रमाचे मुख्य अतिथी होते भाई चतरसिंघ परदेशी (पुनावाले) यांनी शीख पंथाचे दहा वे  गुरू श्री गुरू गोबिंदसिंघ जी च्या जीवना विषयी महत्वाचे ऎतिहासिक माहीती देण्यात आली. भाई चतरसिंघ परदेशी यांनी आपल्या बाणी व किर्तण द्वारे मोलाचे मार्ग दर्शन केले.श्री गुरू गोबिंदसिंघ जी ने भक्ती व शक्ती मार्ग का घेतला. कारण औरंगजेब च्या अत्याचारा मुळे श्री गुरू गोबिंदसिंघ जी ला भक्ती बरोबर शक्तीचा हि मार्ग  घेण्यास भाग पाडले होते.औरंगजेब अत्याचारा च्या विरोधात मोठा लठा गुरू गोबिंदसिंघ यांनी दिला.आणि श्री गुरू गोबिंदसिंघ जी ने आपल्या चार ही मुलांना आपाल्या डोळ्या समोर सहीद होता बगीतले.अश्या प्रकार चे  मोला चा इतीहास सांगण्यात आले. या नंतर अरदास करून कार्यक्रमा ची समाप्ती करण्यात आली. या कार्यक्रमात जि.प.सदस्य सतीश वारजुरकर व शेगांव पो.स्टे.चे ठानेदार उपस्थीत होते.व कार्यक्रमा चा आभार प्रदर्शन सुरजीतसिंग बावरी यांनी केला. त्या नंतर सर्व संगतला गुरू का लंगर (प्रसाद) वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!