शेतात पेरलेले सोयाबीन अजूनही हिरवेगार शेतकऱ्याचे मोठे नुकसान.. क्रुषी अधिकारी पं स.चिमुर यांचेकडे तक्रार दाखल..
शेतात पेरलेले सोयाबीन अजूनही हिरवेगार शेतकऱ्याचे मोठे नुकसान..
शंकरपूर(जगदिश पेंदाम)
नेरी येथून जवळच असलेल्या सरडपार शिवारातील शेतात पेरलेले सोयाबीन अद्यापही हिरवेगार असल्याने शेतकऱ्यांने आश्चर्य व्यक्त केले आहे, नेरी येथील रहिवासी अशोक तिडके यांची सरडपार शेत शिवारात नऊ एकर शेती आहे पैकी तिन एकरामध्ये त्यांनी १०८ दिवसाचा जड सोयाबीनची पेरणी केली सदर बिज २२८ ,रायझिन्स सिड्स वसंत क्रुषी केंद्र चिमुर येथून १२-६-२१ ला खरेदी केले व १६-६-२१ ला पेरणी केली पेरणी नंतर झाड व्यवस्थित आले, चलपा ( शेंगा) झाडाला पकडल्या मात्र चार महीन्याचा कालावधी लोटुन गेला तरीही आतापर्यंत सोयाबीन कापणीवर आला नाही त्यामुळे सोयाबीन बियाणे निक्रुष्ट दर्जाचे कोणत्या जातीचे माथी मारले तर नाही ना ? या शंकेने शेतकऱ्यांला घेरले असुन शेतकऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे
अजुनही पेरलेला सोयाबीन हिरवागार असुन दाना हिरवा आहे, तर नुसत्या शेंगा चलपा, काही शेंगाना दाने डाँमिस भरले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे १२००००रु.चे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे
संबंधित शेतकऱ्यांने क्रुषी अधिकारी पं स.चिमुर यांचेकडे दि १३-१०- २१ ला तक्रार दाखल करून या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!