राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बल्लारपुर विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न







 प्रतिनिधी:- मुल 


          रोज सोमवारला बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार श्री छगनराव भुजबळ साहेब ह्यांच्या हस्ते पार पडला  सदर उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिति म्हणून अ. भा. महात्मा फुले समता परिषद चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ , राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरजी बाळबूधे , भंडारा चे माजी खासदार मधुकरजी कुकड़े  ,अ. भा. महात्मा फुले समता विदर्भ प्रमुख दिवाकर गमे, अ. भा. महात्मा फुले समता प्रदेश सचिव रविजी सोनवाणे, राष्ट्रवादी कांग्रेस  चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य ,महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उइके, अ. भा. महात्मा फुले समता परिषद चे जिल्हाध्यक्ष श्री जगदीश जूनघरी , चंद्रपूर चे माजी नगराध्यक्ष दीपकजी ज्यस्वाल, ज्योतिताई रंगारी, उपस्थित होते.
     मान. मंत्री महोदयांचे ढोल  ताशांनी स्वागत मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यांनी केले.


            सदर उद्घाटन कार्यक्रमात          मंत्री महोदयांनी फुले ,शाहू, आंबेडकर, ह्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून प्रतिमे जवळ दिप ज्वलन करन्यात आले. ह्यानंतर बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ व समवेत पदाधिकारी ह्यांनी मान.भूजबळ साहेब  ह्यांचे भव्य पुष्प हाराने स्वागत करण्यात आले.


       त्या नंतर मान. नामदार छगनराव भूजबळ साहेब यांनी कार्यक्रमाला पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त्यांना मौलाचे मार्गदर्शन केले.
        राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी  जोमाने पक्ष संघटन करण्याचा सल्ला दिला व पुढील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादीचा विजय होईल अशाप्रकारे साहेबांनी भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
          सदर कार्यक्रम यशस्वी होन्या करिता राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, आदि बहुसंख्य कार्यकर्ते सदर कार्यक्रमात परिश्रम करुण यशस्वी केलेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!