स्वयंसहाय्यता समुहांसोबत दिवाळी.
गौरव शामकुले
तालुका प्रतिनिधी,मुल
दिवाळी फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उदघाटन
दिनांक 29/10/2021 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. मूल अंतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहातील होतकरु महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व स्वयंसहाय्यता समूहांनी दिवाळी सनानिमित्य बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी पंचायत समिती मूल येथील परिसरात स्टॉल उभा करून दिवाळीचे फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिति तील सर्व कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी कु. जयश्री कामडी Bc- FL , श्री प्रकाश तुरणकर तालुका व्यवस्थापक BM-IBCB, श्री निलेश जीवनकर , BM MIS, श्री अमर रंगारी , प्रभाग समन्वयक, श्री मडावी, bc org श्री. वसीम काझी, प्रशा तथा सहा. लेखा, श्री गिरीधर चरडुके शिपाई, व उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व समूह संसाधन व्यक्तीनी परिश्रम घेतले. व दिवाळीचे फराळ,विक्रि स्टॉलचे थाटात उद्घाटन झाले.
यानिमित्याने जास्तीत जास्त लोकांनी दिवाळीचे फराळ व साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!