कांपा -चिमूर रोड वर अवैध जनावर तस्करी करणाऱ्या वाहना मुळे सकाळी फिरायला जानाऱ्या लोकांना धोका

भरधाव चालत असतात या pik up वाहन

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - कांपा-चिमुर रोड मार्गे नेहमिच सकाळला ५ ते ७ वा.दरम्यान अवैध जनावर तस्करांचे भर वेगाने वाहन जात असतात.हे वाहान नेहमिच कट मारीत जात असतात.या रोड ने तीन ते चार अवैध रित्या गो वाहतुक करणारे बुलेरो पिकप नियमीत जात असतात.या रोड वर बरेशे नागरीक सकाळला फिरायला जात असतात.त्यामुळे सकाळला फिरणाऱ्या नागरीकाना धोका होऊ शकतो.हि बाब नाकारता येत नाही? नेहमीच रेती,मुरूम,जनावर व दारू तस्कराच्या वाहानाने अपघात होत असताना नेहमीच पाहयला मिळत आहे.पोलीस विभागानी या कडे लक्ष देण्याची गरज आहे. जनावर तस्करी करणाऱ्या वाहनाचा बंदोबस्त करण्यात यावे व योग्य कार्यवाही करण्यात यावी.जेने करून कोणत्याही प्रकारची घटना होऊ नये अशी नागरीका कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!