भिसी - चिमूर रोडवरील चिखली फाट्याजवळ अपघात ; दोन युवक जखमी

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - उमरेड भिसी - चिमूर  रोडवर ( राष्ट्रीय महामार्ग 353- ई ) शनिवारला ( 30 ऑक्टोबर ) रात्री सव्वासात वा. च्या दरम्यान मोटारसायकलने जात असतांना दोन युवकांचा अपघात झाला. दोन्ही युवकांना टायगर ग्रुप च्या सदस्यांनी व भिसीचे माजी ग्रा. प. सदस्य शेखर ठोंबरे  यांनी तात्काळ मदत करून भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
युवराज डांगे रा.कन्हाळगाव ( वय - 40 ), संजय गणवीर,  रा.- कन्हाळगांव ( वय - 40 ) असे जखमी  युवकांचे नाव आहे. प्रा. आ. केंद्र भिसी येथे डॉ.बावनकुळे यांनी जखमीन्वर तात्काळ प्राथमिक उपचार केला आणि पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.युवक कामानिमित्त कन्हाळगाव येथून भिसीला येत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!