अमरावती कत्तलखान्यात गायी भरुन नेणाऱ्या ट्रक चा अपघात ; एका इसमासह 18 गाईंचा मृत्यू ; 15 गायी व एक इसम जखमी

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - दिनांक. 30 ऑक्टोबरला रात्रौ 12.30 च्या दरम्यान भिसी येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोली बस स्टॉप जवळ गिट्टी भरलेल्या टिप्पर ची धडक  गायी भरून असलेल्या ट्रकला लागली व ट्रक पलटी झाला.त्यात एक इसम व 18 गाई ठार तर एक इसम व 15 गाई जखमी झाल्या आहेत.

ट्रक मध्ये भरून 33 गाई  कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याची माहिती प्राप्तझाली आहे.
 प्राप्त माहितीनुसार लाखांदूर वरून 33 गाई भरून भिसी मार्गे उमरेड व्हाया अमरावती  जाणारा ट्रक (  क्रमांक MH 40 BG 6617 ) तसेच नागपूर कडून भिसी मार्गे गिट्टी भरून येत असलेला टिप्पर ( क्रमांक MH 40 BG 9216 ) या वाहनांची भिसी उमरेड महामार्गावर असलेले  चिंचोली बस स्टॉप जवळ परस्परांना धडक लागल्याने गाई भरून असलेला ट्रक पलटी झाला व त्यात सलमान शेख कुरेशी ( वय 22 वर्ष,रा.- टेका नाका, नागपूर )  या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक मोहम्मद इर्शाद कुरेशी ( वय 28 वर्ष, राहणार -  कांदीवाडा, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश )  हा गंभीर जखमी झाला तर  टिप्पर चालक व वाहक पसार झाले.

    घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जंगम सहकाऱ्यासह घटनास्थळी  जाऊन पंचनामा केला व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5 ,5अ ,,5ब 9/12,  प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11,11 अ ,  11 ड, नुसार तसेच अपघात कलम नुसार गुन्हा नोंद केला आहे.जखमी गायींना तपोभूमी गोंदोडा येथील  गोशाळेत पाठविण्यात आल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जंगम हे करितआहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!