भरधाव मुरूमाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने ९ मेंढया जागेवरच केल्या ठार
मेंढ्या चे मालक थोडक्यात बचावले
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - कांपा - चिमुर रोडवर मालेवाडा स्मशान भुमी समोर रोडच्या बाजुला मेंढयाचा कडप हा चराईमध्ये चरीत असतांना जांभुळघाट वरून मुरूम भरलेला ट्रक भरधाव वेगाने चिमुर कडे जात असता मालेवाडा जवळ स्मशान भुमी समोर हि घटना सायंकाळी ०५:१५ वा.च्या दरम्यान घडली.गाडी क्र.एम.एच.३४,२४७९ हा ट्रक क्रमांक असून ९ मेंढयाना या मुरूमाची तस्करी करणाऱ्या ट्रकने जागेवरच चिरडून ठार केले. या मेंढ्या चराई करणारा व्यक्ती दयाराम जिवतोडे मु.मालेवाडा ता.चिमुर हे रोड लगत आपल्या मेंढया रोड लगत चारीत होते.ते थोडक्यात बचावले व या ट्रकास जांभुळघाट वरून चिमुर ला जात असतांना, आर.टि.एम कॉलेज जवळ पकडण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!