ज्योती बोडणे मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा पत्रकार परिषदेत परिवाराची मागणी.
ज्योती बोडणे मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
पत्रकार परिषदेत परिवाराची मागणी.
तळोधी(बा.) यश कायरकर
तळोधी (बा.) येथील विवाहिता ज्योती संतोष बोडणे हिच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी तळोधी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
तळोधी ( बाळापूर ) येथील रहिवाशी मृतक ज्योती बोडणे या महीलेचे माहेर चिमूर तालुक्यातील नेरी आहे. म्हणुनच मृतक ज्योती संतोष बोडणे ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करन्या करीता नेरी मधुनच ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर अतंर्गत चिमुर येथील उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करीता भरती करण्यात आली.
दिनांक 28 ऑक्टोंबर 2019 या दिवशी एकूण नऊ महिलांची शस्त्रक्रिया या केंद्रात करण्यात आली मात्र यावेळी आठ शस्त्रक्रिया आहे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ भगत यांनी केल्या तर एक शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ. वैशाली सारंग यांनी केली. या दिवशी नऊ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यापैकी पहिल्या चार शस्त्रक्रीया डॉ. गोपाळराव भगत यांनी केल्या तर पाचवी मृतक ज्योती बोडणे हिची शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ. वैशाली सारंग यांनी केली. व त्यानंतरच्या चार शस्त्रक्रिया परत डॉ.भगत यांनीच केल्या.
मृतक ज्योति बोडणे ची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया डॉक्टर वैशाली सारंग यांनी केली. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणे चुकीच्या पद्धतीने केलेल्या या शस्त्रक्रिये मुळे ज्योती बोडणे ला आपला जीव गमवावा लागला. शस्त्रक्रिया करण्यात आल्या नंतर अर्ध्या तासानंतर जेव्हा ज्योती बोडणे शुद्धीवर आली तेव्हा तिला पोटात गंभीर दुखापत जाणवली व पोट फुगून तिला उलटी झाली. याबाबत ज्योती त्याच्यासोबत असलेल्या आईने डॉक्टर भगत व डॉक्टर वैशाली सारंग यांना तात्काळ सूचना दिली. मात्र एक सलाईन लावली व काही होत नाही असे सांगून त्यांनी दुर्लक्ष केले . मात्र ज्योती बोडणे चा त्रास सुरू राहिला व तिच्या त्रास वाढत गेला त्यानंतर सोबत असलेले महिला व वार्डातील इतर शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचे सोबत आलेल्या लोकांनी वारंवार तिची प्रकृती चिंताजनक होत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र ती सामान्यच आहे. काही होत नाही आहे असे बजावून तुम्ही डॉक्टर आहात की डॉक्टर आम्ही आहोत असे मृतकाच्या सासूबाईला डॉक्टरांनी उलट उत्तर दिली.
मात्र दोन दिवसापर्यंत सतत ज्योती कडे दुर्लक्ष केले गेले. व 29 तारखेला रात्री तिची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्यानंतर तिच्या परिवाराला बोलून तुम्ही तिला तात्काळ चंद्रपूरला घेऊन जा आमच्या हाताने चुकीची नस कापली गेली ल्यामुळे आम्ही आता काही करू शकत नाही. असे सांगितले. त्यानंतर 30 तारखेला सकाळी ज्योतीला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात घेवून गेले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया केली व तिला आयसीयूमध्ये भरती ठेवले.त्यानंतर त्याच दिवशी रात्री १० वाजता तेथील डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषीत केले.
सदर प्रकरणातील ज्योती संतोष बोडणे या महिलेचे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतांना वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाळ भगत यांच्या निष्काळजीपणा व स्त्री रोगतज्ञ डॉ. वैशाली सरांगे यांच्या चुकिच्या पध्दतीने शस्त्रक्रिया कस्तांना चुकीची नस कापल्यामुळे सदर महिलेला असह्य त्रास सहन करावा लागला व त्यातच सदर महिलेचा मृत्यू झाला.
*तीच्या मृत्यू मुळे तिच्या मृत्यूनंतर साडेतीन वर्षांची मुलगी आराध्या , व केवळ चार महीन्याचा मुलगा संजोग आईविना पोरके झालेत* यामुळे दोषी डॉक्टरांबर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ज्योतीच्या नातेवाईकांनी केली आहे.
या तळोधी बा.येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सासरे गणपत बोळणे,सासू लक्ष्मी तुकाराम बोळणे,दामोधर बोळणे ,संतोष बोळणे,येणुताई बोळणे,जीवन निकेसर,क्रिष्णा बोळणे,रुपेश घिये,व अंरविद बोळणे हे उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!