वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी



Public Panchanama
मूल (प्रतिनिधी)
चिचाळा येथे आज अखिल गांगरेड्डीवार यांचे डस्टर वाहनाने धडक दिल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना आठ वाजताच्या सुमारास घडली.
भेजगाव वरून अखिल गांगरेड्डीवार हे मूल येथे जात असताना त्यांचे डस्टर गाडी क्रमांक MH 34 AM 7333 या गाडीने दुचाकी वाहनास धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला मूल येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मूलचे पोलीस घटनास्थळी जाऊन अधिक तपास करीत आहे.


#accident

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!