पोषण माह अंगणवाडी केंद्रामध्ये साजरा
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक ०१/०९/२०२१
ला अंगणवाडी केंद्र क्रमांक.६० बजरंग वार्ड पवनी येथे पोषण महा चे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला वार्डातील गर्भवती माता, स्तनदा माता,शून्य ते सहा वर्षाच्या मुलांच्या माता, किशोरी मुली प्रामुख्याने हजर होत्या. सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती. लता अशोक तेलमासरे सौ. सुशीला टेकचंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. माहे सप्टेंबर महिना पोषण महा म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो २०१८ पासून हा महाराष्ट्र शासनाने माहे सप्टेंबर संपूर्ण महिना गर्भवती माता, स्तनदा माता, व ० ते ६ वर्षाचे बालके, किशोरी मुलींचे सर्वांगीण विकासासाठी आरोग्य स्वच्छता बालकांचे कुपोषण दूर व्हावे बालकांची आरोग्य तपासणी अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाते. कमी वजनाच्या मुलांची तपासणी बाल रोग तज्ञ यांच्याकडून केली जाते. त्यांना योग्य औषध उपचार व चौरस आहार( वैविध्यपूर्ण) कसा व वेळोवेळी द्यावे, हात स्वच्छ धुऊनच द्यावे,आईला मार्गदर्शन केले जाते, पोषण वाटिका,घराच्या शेजारी परसबाग लावावी, गर्भवती मातांचे स्तनदा मातांचे किशोरी मुलींचे बालकांचे योग्य वायाम रुग्णालयात किशोरी मुलींना नेऊन हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासून त्यांना आहाराचे मार्गदर्शन करून त्यांचे रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. असे वेगवेगळ्या विषयावर कार्यक्रम घेऊन माहे सप्टेंबर महिना साजरा केला जातो. कार्यक्रमाला सर्व लाभार्थ्यांकडून पोषण प्रतिज्ञा पोषण महा रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये घोषवाक्य म्हणवून घेतले. सही पोषण देश रोषन, श्रीगणेशा स्वच्छतेचा हाच उपाय आरोग्याचा, बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, झाडे लावा, झाडे जगवा, सुदृढ सतती हीच खरी संपत्ती, कुपोषण दूर झालेच पाहिजे. असे म्हणून आहार व आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मातांचे बालकांचे अंगणवाडी सेविका सौ.शालू सुरेश अवसरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सौ.किरण पाटील,नीलिमा अवसरे, अनिता अवसरे, बेबीताई अवसरे, सौ. रुपालीताई मोटघरे,सौ. रोमा सावरकर सौ. कोमल तेलमासरे,सौ. रूपाली सावरकर, सौ.संगीता तलमले, कुमारी हिना अवसरे, करिश्मा अवसरे, प्रफुल्ल अवसरे, आलोक माटे, साहिल मंडपे, पियुष मुंडले, गुरुदेव बावनकर, अनवित माटे, लखन बावनकर तसेच शून्य ते सहा वर्षाच्या बालकांच्या माता अंगणवाडीतील लहान बालके व त्यांचे पालक कोरोनाची सतर्कता घेऊन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंगणवाडी मदतनीस सौ. मनोरमा गणपती कटारे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!