संजय येरणे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नागभीड: यश कायरकर.
सन 2021 चा चंद्रपूर जिल्हा शिक्षक पुरस्कार, संजय व्हीं येरणे, साहित्यिक, सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी, पं. स. नागभीड यांना मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार आपत्ती व्यवस्थापन मंत्री म. रा. यांचे शुभ हस्ते तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ. संध्याताई गुरनुले, अध्यक्ष जि. प. चंद्रपूर, मा. डॉ. मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर, मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार चंद्रपूर, मा. सुरेखाताई कारेकर, उपाध्यक्ष जि. प, मा. जितेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी प्राथ, व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक जिल्हा परिषद चंद्रपूर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संजय येरणे तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षक असून विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकासासाठी त्यांनी स्वतः इंग्लिश रीडिंग पॅटर्नचे संशोधन करून पुस्तक प्रकाशित केले आहे. कमी वेळात व कमी श्रमात इंग्रजी वाचन कौशल्य वाढवण्यास मदत झाली आहे. वीस वर्ष सेवा कालावधी त्यांनी मोहाडी, नवेगाव हुंडे या शाळेत योगदान देत गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील 25 हून अधिक कथा, कादंबरी, समीक्षा, कविता आधी प्रकारातील ग्रंथ, पुस्तके प्रकाशित करणारे पहिले साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरही गेले आहे, संत साहित्य अभ्यास, संशोधन कार्य, जगातील संताजी या विषयावरील पहिली कादंबरी साकारण्याचा सन्मान महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. साहित्याचे अनेक ग्रंथांना राज्य पुरस्कार असून संवेदनशील कथाशैली हे विशेष गुण आहे. वाचन, लेखन छंद सोबतच शिक्षण क्षेत्रातही नवेनवे उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहेत. शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक संशोधन व वैचारिक लेखन कार्य, डिजिटल शैक्षणिक अध्यापन पद्धती, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य, शिष्यवृत्ती, नवोदय मार्गदर्शन, लोकसहभाग, शाळा सजावट व्यवस्थापन निर्मिती, आदी उपक्रमात ते सक्रीय राहिलेत. त्यांच्या निवडीबद्दल मा. पं. स. सभापती प्रफुल खापर्डे, संवर्ग विकास अधिकारी साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद नाट साहेब, श्री बांगरे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री प्रदीप मोटघरे केंद्रप्रमुख, श्री सागर शंभरकर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, नरेंद्र वासनिक सर, तथा केंद्रातील सर्व शिक्षक, सर्व मित्र मंडळ परिवारातर्फे त्यांच्या यशस्वीतेचे कौतुक करीत अभिनंदन करण्यात आलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!