बेनिक्रेकरांची भावेश्वरीवरील श्रद्धा कौतुकास्पद......!
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार....
ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवी मंदिराचा पायाभरणी समारंभ उत्साहात
जिल्हा - प्रतिनिधी ( उमेश विभूते )
कोल्हापूर : - दि.२७/०८/२०२१
बेनिक्रे ता. कागल येथील ग्रामस्थांची ग्रामदैवत श्री. भावेश्वरीदेवी वरील श्रद्धा अपार आणि कौतुकास्पद आहे, असे उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. मंदिराच्या पायाभरणी समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंदिराला ४० लाखांचा निधी दिला आहे. बांधकामासह परिसर सुशोभीकरणालाही निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले.
व्यासपीठावर छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखान्याचे संचालक ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. शिवानी भोसले हे प्रमुख उपस्थित होते.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल तालुक्यात विधायक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच पक्षाचे नेते एकत्र येऊ शकतात याचेच हे द्योतक आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा आजही जिवंत असल्याची ही प्रचिती आहे.ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, या मंदिराच्या बांधकामासाठी ग्रामविकास मंत्री हसन साहेब मुश्रीफ यानी ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या निधीतूनही या मंदिराला फंड देऊ.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत मी निवडून आलो, मंत्री झालो. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे आभार मानायलासुद्धा गावागावांमध्ये जाता आलं नाही. आपण सर्वांनी आई -वडील, भाऊ -बहीण, पत्नी, मुले असे अनेक आप्तेष्ट व मित्रमंडळी गमावली. गोरगरिबांची सेवा आणि विकासकामे करताना कुठल्या गावाने मते कमी दिली, जास्त दिली हा विचार कधीच केला नाही. आम्ही दोन्हीही उमेदवार येथे आहोत, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सरपंच सौ. अश्विनी गुरव, उपसरपंच सूर्याजी जाधव, माजी सरपंच मारुतराव काळुगडे, माजी सरपंच सखाराम जाधव, वाय. आर जाधव, अण्णासाहेब वाडकर, गणपतराव इंगळे, आर. व्ही. पाटील, वसंत जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.बेनिक्रे ता. कागल येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवीच्या मंदिराचा पायाभरणी समारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक, सौ. शिवानी भोसले, प्रवीणसिंह भोसले, सरपंच अश्विनी गुरव, उपसरपंच सूर्याजी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!