विरोधकांना ई - डी ची चौकशी लावून नामहरण करण्याचं काम गेल्या पाच वर्षांत भाजप ने केलं - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जिल्हा - प्रतिनिधी ( उमेश विभूते )

कोल्हापूर : -  विरोधकांना ई डी लावून नामहरण करण्याचं काम गेल्या चार पाच वर्षात भाजप पक्ष करत आहे. हे लपून राहिलेले नाही. नेत्यांना लोकांमध्ये बदनाम करणे अश्या पद्धतीचे बातम्या पेरणे हे काम भाजप करत आहे. अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ते सांगली मध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यालय समोर भव्य असा पक्ष प्रवेश घेण्यात आला. भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील म्हणाले, विरोधकांना ई डी लावून नामहरण करण्याचं काम गेल्या चार पाच वर्षात भाजप पक्ष करत आहे. आता खडसे आणि भुजबळ साहेबांना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे पण ते बदनाम होणार नाहीत.चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांची आपली प्रतिमा स्वछ आहे. कोणतेही गुंडगिरी कधीही झाली नाही. पोलिसांनी असे काम कधी केले नाही. सर्वाना माहिती झाले आहे. पोलीस ऐकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे हे सरकार पाच वर्षे जात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे निराशा जनक वक्तव्य अधून मधून बाहेर येतात असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांच्या मोर्चातील सर्व मुद्दे आम्ही नोट केले आहेत. त्यांना कोणतीही अडचण नाहीये. त्यामुळे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही. पुराची परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही पाणी कर्नाटक ला सोडत आहे. पण राजू शेट्टी यांना नको असेल तर मी रद्द करतो. पण असे वक्तव्य हवेत करणे गरजेचे नाही. शिरोळ तालुक्यात पाणी येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण राजू शेट्टी यांचा विरोध असेल तर काही हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!