नागाव येथे यशवंत सेना शाखा नं १२ चे भव्य उद्घाटन संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )
हातकणंगले : - १६/०८/२०२१ रोजी यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर तालुका हातकणंगले येथील नागाव येथे यशवंत सेना शाखा क्र. १२ व्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी उपस्थित यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश तांबवे यांच्या हस्ते फित कापून बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित *जिल्हा संपर्क प्रमुख डॉ संदीप हजारे, जिल्हाअध्यक्ष संजय काळे, जिल्हा सचिव योगेश हराळे, संजय गांधी निराधार योजना सदस्य डॉ. विजयकुमार गोरड, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत वळकुंजे, युवा जिल्हा उपाध्यक्ष निवास कोळेकर, जिल्हा संघटक तमा शिरोळे, करवीर तालुका अध्यक्ष शहाजी बनकर, वैद्यकीय जिल्हा सल्लागार समिती अध्यक्ष डॉ शिवराज पुजारी, नागावचे लोकनियुक्त सरपंच अरुण माळी, पोलीस पाटील बाबासो पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार मिठारी, करवीर तालुका उपाध्यक्ष संदीप वळकुंजे, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष गणपती सिद्ध, संघटक सतीश गावडे, भीमराव वळकुंजे, या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंत सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नूतन शाखेचे शाखा अध्यक्ष शिवाजी रानगे, उपाध्यक्ष भगवान पुजारी, शाखा सचिव शुभम पुजारी यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले व त्यांचा सत्कार समाजाचा गौरवशाली इतिहास प्रतिमा भेट व बुके देऊन करण्यात आला.जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. संदीप हजारे साहेब यांनी उपस्थित समाज बांधवांना यशवंत सेनेचे कार्याची माहिती देऊन समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये यशवंत सेना कायम पाठीशी राहील असे आश्वासन दिले. डॉ विजयकुमार गोरड सर यांनी शाखेचे नवनियुक्त पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देऊन नागावातील समाज बांधवांचे शाखा स्थापन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.नागावचे सरपंच अरुण माळी साहेब यांनी यशवंत सेनेचे कार्य कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे यशवंत सेना कायम समाजाचे प्रश्न सोडवत आहे असे कौतुक केले.यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष निवास कोळेकर (शाहीर) यांनी समाजातील युवकांनी संघटन वाढवून मेंढपाळ तसेच अन्याय अत्याचार होईल तिथे धाव घेतली पाहिजे. असे मत व्यक्त केले.यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, मनिक लांडगे, आप्पासो पुजारी, यशवंत पुजारी, अरुण हराळे, तात्यासो हराळे,रघुनाथ पुजारी, सुधाकर पुजारी, सर्जेराव हराळे, भगवान लांडगे, शिवाजी पुजारी, सोमनाथ पुजारी, संभाजी पुजारी,शिवाजी हराळे, बंडा पुजारी, राहुल पुजारी इत्यादी समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा सचिव योगेश हराळे यांनी मांडले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!