समतेच्या शोधात
शीर्षक :- समतेच्या शोधात
खुप काळ लोटला,
स्वातंत्र्य मिळूनी,
आज भटकते ती,
समतेच्या किनाऱ्यांनी...!!१!!
मिळते तिला स्थान,
भाषणात सर्वांत आधी,
पण दुजोरा व्यवहार होतो,
आणि पुरूषार्थ येतो मधी..!!२!!
जखमा तिच्या नेहमी,
दुर्लक्षीत होतात,
ती विचारते स्व:ताला,
कुठे जाऊ समतेच्या शोधात..!!३!!
बाईपण म्हणूनी,
कुणी तिला मिरवतात,
विषमतेच्या नावावर,
काहीजण हिणवतात...!!४!!
आई,बहीन,लेक,
रूप तिचे अनेक ,
वारसदार मुलगा हवा,
म्हणतात लोक कित्येक...!!५!!
समतेच्या शोधात,
शेवटी ती हरते,
असाचं प्रवास करत,
स्वर्ग ती गाठते...!!६!!
✒️कु. श्रद्धा एस. त्रिनगरीवार
🛣️ मु.पो. आल्लापल्ली
जि. गडचिरोली
(टिप:- कवितेतून कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही..!)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!