वेश्या..
काव्यनक्षत्र
वेश्या..
निवस्त्र तिच्या देहाचे
किती भोग झाले..
असंख्य भावनांच्या आहुतीत,
भोगणाऱ्यांचे उतावीळ शरीर थंड झाले..
शृंगाराने केलेला तो लिलाव
पैशासाठी नव्हताच खरा !
गहाण ठेवलेल्या पोटाच्या भूकेला
फक्त शरीर विकणे न उमगणारा होता प्रवास..
तो नेहमीच अहंकारात तरंगतो
तिला शांत केलं हा घमंड करतो..
तिच्या शरीराची तोडलेली लक्तरे बघं !
तुझा धिक्कार करते..
त्या अशांत सज्जनांना ती शांत करते.
जरी यौवनाच्या वणव्यात सतत जळते..
क्षणिक असुरी आनंदाचा गगन त्याला मिळतो.
मात्र नेहमीच ती पराधीन वेश्या ठरते..
© माधुरी लेनगुरे
💫 नक्षत्र


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!