एफ.ई . एस गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा




प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

स्थानिक एफ.ई.एस गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर  येथे शारीरिक शिक्षण आणि खेळ विभागाद्वारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्या जुमडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र बारसागडे आणि संगीत विभागाचे प्रा. अशोक बनसोड होते. 
प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच प्रा. अशोक बनसोड यांनी भारतीय खेळ आणि सद्यस्थिती आणि मेजर ध्यानचंद यांचे स्थान यावर भाष्य केले प्राचार्य डॉ. विद्या जुमडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या खेळ कौशल्यावर प्रकाश टाकला मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रात कसे प्रेरणास्थानी आहेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख आनंद वानखेडे यांनी केले सदर कार्यक्रमास  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!