राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकांचा पक्षप्रवेश
मूल :- प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार शरदचंद्र पवार साहेब याच्या विचारांची प्रेरणा घेऊन शेतकरी कष्टकरी मजूर लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विधायक कामे करता यावी म्हणून मूल तालुक्यातील ताडभुज या गावातील युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नितीनभाऊ भटराकर याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सोनल मडावी आणि मूल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे स्विकारत पक्षात प्रवेश केला.
त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जेष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला! यावेळी उपस्थित नागरिक.. दशरथ वाकुडकर, तुळशीराम वाकुडकर, अरविंद कुडमेथे, अतिक वाकुडकर, राजू राऊत, श्रीधर कुडमेथे, प्रवीण कुडमेथे, वासुदेव मठे, नामदेव वाकुडकर, मुकुंदा आत्राम, वामन राऊत, जीवन राऊत, चेतराम वाकुडकर, देविदास वाकुडकर, आशिष वाकुडकर.. या सर्वांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!