शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या विषयी अपशब्द वापरल्याने पोलिस शिपायावर गुन्हा दाखल
जिल्हा - प्रतिनिधी ( उमेश विभूते )
कोल्हापूर : - शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष अशोक भोरडे यांच्याबद्दल एका पोलिस कर्मचाऱ्याने फोनवर बोलताना अपशब्द वापरल्याने वेल्हा पोलीस स्टेशन येथे पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई बडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका असल्याने शासनातर्फे त्यांना सशस्त्र पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे. त्याच्या संरक्षणकामी नेमणूकीस असणारे पोलीस शिपाई लोंढे आणि पोलीस शिपाई जारवाल हे आजारी असल्यामुळे रजेवर गेले होते. त्यांच्या जागी पोलीस शिपाई सुदर्शन माने व पोलीस शिपाई बडे यांची नेमणूक करण्यात आली होती.
अशोक भोरडे हे कामानिमित्त वेल्हा तालुक्यात गेले होते. त्यांच्या सोबत शासकीय अंगक्षक पोलीस शिपाई माने हे होते. वेल्हे येथे असताना दुसरे अंगरक्षक पोलीस शिपाई बडे यांनी माने यांच्याशी फोन वर बोलत असताना माने यांचा फोन स्पिकरवर होता. त्यावेळेस दोघांचा सवांद चालू असताना बडे यांनी भोरडे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. बडे यांनी वापरलेले अपशब्द भोरडे व त्यांच्या सोबत असलेल्या लोकसेवक यांनी ऐकले, अपशब्द वापरल्यामुळे भोरडे यांनी वेल्हा पोलिस स्टेशनला पुणे ग्रामीणचे पोलीस शिपाई बडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास वेल्हा पोलिस स्टेशन करत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!