कोरोना काळातील पद्धती प्रमाणे ५० टक्के वीजबिल भरणा करून ग्राहकांना सहकार्य करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने करणार आंदोलन - शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव
तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )
हातकणंगले : - कोरोना महामारीच्या काळातील टाळेबंदी तसेच मागील महिन्यात थैमान घातलेल्या पूरपरिस्थितीने घरगुती,व्यावसायिक (यंत्रमाग) तसेच शेती पंप कनेक्शन असलेल्या वीज ग्राहकांची आर्थिक नाडी पूर्णपणे ठप्प झाली होती. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे कोणतीही पूर्वकल्पना न देता इचलकरंजी शहरातील विशेषतः पूरबाधित क्षेत्रातील घरगुती व व्यावसायिक वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत.
त्यामुळे कोणत्याही ग्राहकांवर जबरदस्ती न करता विद्युत वितरण कंपनीने कोरोना काळातील पद्धतीप्रमाणे ५० टक्के वीजबिल भरणा करून ग्राहकांना सहकार्य करावे. अन्यथा शिवसेनेच्यावतीने विद्युत वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मा.मुरलीधर जाधव यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ इचलकरंजी येथील अभियंता यांना भेटून शिवसेना इचलकरंजी शहर यांच्यावतीने मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव दादा,पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!