मालेवाडा या गावातील बस्टॉप ला लागून असलेले बाबळी चे झाड जीवघेणा स्वरूपाचे - योगेश ठुने राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर वरून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या मालेवाडा या गावातील बस्टॉप वर बाबळी चे झाड पडले असून बस्टॉप जिर्ण स्वरूपाचे आहे. एकिकडे पावसाळा सुरू आहे.प्रवासी यांना याठिकाणी बस ची प्रतिक्षा करायला फार भीती वाटत असते व हे बस्टॉप चिमूर या ठिकाणी जाण्यासाठी अगदी मुख्य मार्गावर आहे.यासमोरील वळण मार्ग हे ऍक्सीडेंट पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक अपघात झाली असून अजून पर्यंत सार्वजनिक उप बांधकाम विभाग चिमूर यांचे नियमित दुर्लक्ष होतांना दिसत आहे. चुकिने या ठिकाणी जीवघेणा प्रकार या वृक्षामुळे घडला तर स्थानिक प्रवासी यांचा जीव जाईल याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!