काँग्रेस पक्ष चिमूर तर्फे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर व खाण्याच्या तेलाच्या दरवाढी विरोधात केंद्र सरकार च्या निषेधार्थ नारेबाजी देत काढली सायकल रॅली

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.११/०७/२०२१ ला काँग्रेस पक्ष चिमूर तर्फे कोरोनाच्या महामारी ला लक्षात घेत गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही ,  रोजगार नाही , नवीन रोजगार भरती नाही , आणि हि प्रट्रोल, डिझेल , गॅस सिलेंडर , तसेच खाण्याच्या तेलाच्या किमतीत दैनंदिन होणारी दर वाढ लक्षात घेता यास कारणीभूत केंद्र सरकार असून या सरकारच्या निषेधार्थ पिसे पेट्रोल पंप वडाळा पैकू ईथुन हजारे पेट्रोल पंप पर्यंत हि काँग्रेस तर्फे सायकल रॅली काढून केंद्र सरकार चा विरोध करीत नारेबाजी करण्यात आली. यावेळी सतीश वारजूरकर जिल्हा परिषद गटनेते चंद्रपूर , संजय घुटके तालुका अध्यक्ष ,विजय डाबरे , राजेश चौधरी , रोशन ढोक उप सभापती , गौतम पाटील , पप्पू शेख , नितीन कटारे , पवन बंडे, प्रमोद दाभेकर, तुळशीदास शिवरकर , शत्रूधन ढोये,प्रशांत डवले , प्रवीण जीवतोडे , अमित मेश्राम , मंगेश रंदये ,शुभम पारखी , रामदास चौधरी , पुंडलिक मेश्राम, संजय लाखे , विलास मोहिणकर , नाजेमा पठाण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष , गीतांजली थूटे , शैनाज अन्सारी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष , ममता भीमटे, दिक्षाताई भगत , कल्पना बनसोड व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!