शाळा बंद शिक्षण सुरू" मॅजिक बस चंद्रपूर संस्थेचा अभिनव उपक्रम
मूल (प्रतिनिधी)
मॅजिक बस चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपीपरी इत्यादी तालुक्यातील शाळांमध्ये "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील दोन वर्षा पासून अविरतपणे राबविला जात आहे.
सद्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तेव्हा पासून मॅजिक बस संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन व
द्यार्थ्यांना फोन द्वारे ऑनलाइन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. त्यामागील मुख्य हेतू असा की विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजावीत व शाळेतील मुख्य विषयांमध्ये मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान इत्यादि विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सतत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा तयार करायला सांगणे, प्रत्येक सत्रा नंतर गृहपाठ देने, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणितीय क्रिया सोडवणे,सूत्र पाठांतर करून घेणे आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत आहेत की नाही? याचा फोन द्वारे पाठपुरावा घेणे, पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासा बाबत चर्चा करणे इत्यादी या अभिनव उपक्रमाचे महत्वपूर्ण घटक आहे. या सगळ्या बाबीना विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे..

वरील कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील ०९ तालुक्यातील ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांन सोबत राबविण्यात येत आहे..
हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्या करीता मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्याचे तालुका समन्वयक, निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नितेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यातील ३० शाळा सहाय्यक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे अथक परिश्रम घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!